24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडादिलीप तिर्की हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

दिलीप तिर्की हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताच्या हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की याची हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भारताचा माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिम्पिकपटू दिलीप तिर्कीची आज हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी तिर्की यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदसाठी अर्ज दाखल केलेल्या दोघांनी आपले नामांकन मागे घेतल्यानंतर दिलीप तिर्कीचा हॉकी इंडियाचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. दिलीप तिर्कीच्या नावावर भारताकडून सर्वाधिक सामन्यात प्रतिनिधित्व केल्याचे रेकॉर्ड आहे. त्याने आपल्या १५ वर्षाच्या दीर्घ कारकिर्दित भारताकडून ४१२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, दिलीप तिर्कीने हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय हॉकीला नव्या उंचीवर नेण्यासाठी काम करणार असे ट्विट केले.

तिर्कीची हॉकी इंडियाच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने देखील त्याचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन, हॉकी इंडियाची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडणा-या प्रशासन समितीतील सर्व सदस्यांचे अभिनंदन करते अशा आशयाचे पत्र त्यांनी पाठवले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या