21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडादिनेश कार्तिक चांगला समालोचक

दिनेश कार्तिक चांगला समालोचक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघनिवडीनंतर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक अजय जडेजाने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अजय जडेजा यांनी हे वक्तव्य दिनेश कार्तिकबाबत केले. अजय जडेजाच्या मते ज्या आक्रमकतेने भारतीय संघ क्रिकेट खेळत आहे त्यानुसार दिनेश कार्तिक भारतीय संघात बसत नाही. अजय जडेजा म्हणाला की, मला दिनेश कार्तिक संघात असू नये असे वाटते. मात्र तो एक चांगला समालोचक आहे त्यामुळे मी त्याला माझ्या शेजारच्या जागेवर बसवू शकतो.

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १५जणांचा संघ आशिया कप जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात विराट कोहली, के. एल. राहुल यांनी पुनरागमन केले आहे. तसेच फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकला देखील संघात जागा मिळाली आहे. मात्र इशान किशन आणि संजू सॅमसन यासारख्या युवा खेळाडूंना डावलण्यात आले.

अजय जडेजाने हे वक्तव्य भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान केले होते. तो म्हणाला होता की, तुम्हाला जर आक्रमक क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा संघ निवडावा लागेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात आहेत तोपर्यंत तुम्हाला दिनेश कार्तिकची गरज आहे. तो तुमचा इन्शुरन्स आहे. मात्र तुम्ही असे करणार नसाल तर दिनेश कार्तिकचे संघात काहीच काम नाही.

माजी क्रिकेटपटूने दिनेश कार्तिकला समालोचक होण्याचाही सल्ला दिला. अजय जडेजा म्हणाला की, मी त्याला संघात घेणार नाही. तो माझ्या शेजारी बसू शकतो. तो एक चांगला समालोचक आहे. मी माझ्या संघात त्याला स्थान देणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या