21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडादिनेश कार्तिक फिनिशर नाही : के. श्रीकांत

दिनेश कार्तिक फिनिशर नाही : के. श्रीकांत

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिक आता सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये जात आहे. जेव्हा-जेव्हा टीम इंडियाला त्याची गरज असते तेव्हा-तेव्हा त्याने धावा केल्या आहेत. आयपीएलपासून दिनेश कार्तिक संघात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्याला भारतासाठी टी-२० विश्वचषक खेळायचा आहे, परंतु भारताचा माजी दिग्गज खेळाडू के. श्रीकांत याने मोठे विधान केले आहे.

भारताचा माजी खेळाडू के. श्रीकांत म्हणाला, फिनिशरची तुमची व्याख्या चुकीची आहे. दिनेश खूप छान खेळतो. त्याने आयपीएलमध्ये पण चमकदार कामगिरी केली आहे. पण तो फिनिशर नाही. जो खेळाडू ८व्या किंवा ९व्या षटकात सामना पूर्ण करू शकतो त्याला फिनिशर म्हणता येईल. खरा फिनिशर १६-२० षटके खेळत नाही. दिनेश कार्तिक जे करतोय त्याला फायनल टच म्हणता येईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या