नवी दिल्ली : रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हा तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा. पण २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे रोहितला सलामीवीर बनावे लागले. आणि त्यात दिनेश कार्तिकचीही भूमिका आहे. टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांनी याबाबत एक मजेदार खुलासा केला आहे.
टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीमुळे सलामीवर बनला हे सर्वश्रुत आहे. विश्वचषकापासून द्विपक्षीय मालिकेपर्यंत रोहितने सलामीवीर म्हणून सर्वत्र कमाल दाखवली आहे. सध्या तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक आहे. अशातच त्याच्या सलामी भूमिकेसंदर्भात नवा खुलासा समोर आला आहे. यासर्वांमागे दिनेश कार्तिक असल्याचे आर श्रीधर यांनी स्पष्ट केले आहे.
धोनीने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने ओपंिनग करण्याचा निर्णय घेतला होता. सराव सामन्यात दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करत होता, त्यामुळे मधल्या फळीत त्याचे स्थान निश्चित झाले. पण कर्णधार धोनीलाही रोहितला संघात कायम ठेवायचे होते. याच कारणामुळे संघ व्यवस्थापनाने विशेषत: कर्णधार धोनीने रोहितला ओपनिंग करण्यास सांगितले. जो खरोखरच एक उत्तम निर्णय ठरला. असे आर श्रीधर यांनी सांगितले.
रोहितनेही धोनीचा विश्वास खरा ठरवला, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनसोबत डावाची सलामी दिली आणि टीम इंडियाने त्याच वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही पटकावले. रोहितने नुकतीच सूर्यकुमार यादवसोबत डावाची सुरुवात केली आहे. त्यामुले सूर्यकुमार रोहितचा विश्वास सार्थ ठरवतो को हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.