27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडाजोकोविच सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत

जोकोविच सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत

एकमत ऑनलाईन

लंडन : अव्वल मानांकित नोवाक जोकोविचने सलग चौथ्यांदा विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली. शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य लढतीत ब्रिटनच्या कॅमरून नोरीवर चार सेटमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता येत्या रविवारी जेतेपदाच्या लढतीत त्याला ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गीओसचा सामना करावा लागणार आहे.

जोकोविच-कॅमरून यांच्या लढतीतील पहिल्या सेटमध्ये कॅमरुनने सर्बियाच्या टेनिसपटूला धक्का दिला. त्याने पहिला सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. त्यानंतर मात्र जोकोविचने आपल्या प्रतिमेला साजेसा खेळ करीत झोकात पुनरागमन केले. त्याने दुसरा सेट ६-३ अशा फरकाने जिंकत बरोबरी साधली. तिसरा सेट ६-२ अशा फरकाने जिंकण्यात जोकोविचला यश प्राप्त झाले. अखेर चौथा सेट ६-४ अशा फरकाने जिंकून जोकोविचने अंतिम फेरीत वाटचाल केली.

सातव्या जेतेपदाची आशा
जोकोविचला आता विम्बल्डनच्या सातव्या जेतेपदाची आशा आहे. राफेल नदालने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे आता जोकोविचच्या जेतेपदाची आशा वाढली आहे. जोकोविच ज्यावेळी विम्बल्डन फायनल खेळण्यासाठी मैदानावर उतरेल त्यावेळी तो रॉजर फेडररला मागे टाकण्यासाठी जोर लावेल. जोकोविचने आपल्या कारकिर्दित आतापर्यंत २० ग्रँड स्लॅम जिंकले आहेत. त्याने रॉजर फेडररशी बरोबरी केली. जर त्याने यंदाची विम्बल्डन जिंकली तर तो फेडररलाही मागे टाकेल.

पोटातील स्रायूदुखीमुळे नदालची माघार
पुरूष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम राफेल नदालच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत २२ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. मात्र राफेल नदालला विम्बल्डन २०२२ मध्ये सेमी फायनलमधून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या पोटाचा स्रायू दुखावल्यामुळे त्याने सेमी फायनल सुरू होण्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस फायनलमध्ये पोहचला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या