नवी दिल्ली : भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात पदक मिळवले असून एकूण २०१ किलोग्राम वजन उचलत तिने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी रविवारी कॉमनवेल्थ गेम्स मधील वेटलिफ्टर मीराबाई चानूचा एक व्हिडिओ शेअर करत तिचे अभिनंदन केले आहे. महिंद्राने ट्विट करत लिहिले की, भारतीय महिलांना कमी लेखू नका. २७ वर्षीय खेळाडूने उहॠ मध्ये एकूण २०१ किलो वजन उचलून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
मीराबाईने यावेळी क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलोग्राम वजन उचलले. त्यानंतर स्रॅच राऊंडमध्ये ८८ किलोग्राम वजन उचलत मीराबाईने आपली आघाडी कायम ठेवली.