28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाद्रविडची कोरोना चाचणी निगेटिव्ह

द्रविडची कोरोना चाचणी निगेटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघाचा मुख्य क्रीडा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. आशिया कप २०२२ च्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता लवकरच राहुल द्रविड भारतीय संघाशी जोडला जाणार आहे.

दुबईमध्ये आज आशिया कपसाठी भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधीच राहुल द्रविड संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना होणार आहे.

आशिया कप स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय संघाचा हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण याची निवड केली होती. आता राहुल द्रविडचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर लवकरच तो पुन्हा संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या