अनेक देशांत ड्यूक चेंडूचा कसोटीसाठी वापर

395
चेंडूची शिलाई हाताने केली जाते

लंडन : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आयसीसी चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या उपयोगावर बंदी आणू शकते. अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने त्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. यादरम्यान ड्यूूक या चेंडू बनवणा-या कंपनीने म्हटले की, लाळेच्या उपयोगावर बंदी आणली तरी चेंडूवर त्याचा परिणाम होणार नाही.

चेंडूची शिलाई हाताने केली जाते. अशात चेंडूला घामाने चकाकी देता येऊ शकते. इंग्लंडसह अनेक देशांत ड्यूूक चेंडू कसोटीसाठी वापरला जातो. कोरोनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात इंग्लंडपासून होणार आहे. ८ आॅगस्टपासून
इंग्लंड आणि वेस्ट इंडिजदरम्यान कसोटी मालिका सुरू होईल.

Read More  नांदेडकरांना दिलासा : १०३ रूग्ण कोरोनामुक्त

ड्यूूकचे मालक दिलीप जाजोदिया यांनी म्हटले की, इंग्लंडमध्ये स्व्ािंगची अडचण राहणार नाही. त्यांनी म्हटले की, खेळातील रोमांच कायम ठेवण्यासाठी चेंडू व बॅटमधील ताळमेळ गरजेचा आहे. चेंडूची शिलाई हाताने केली जाते, त्यामुळे ती दीर्घकाळ कायम राहते. जरी गोलंदाज थुंकीचा उपयोग करू शकणार नाही. मात्र त्याला घामाने चेंडू चमकवण्याची परवानगी आहे. कुकाबुरा चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ बनवतेय. मात्र, ड्यूूक कंपनीने म्हटले की, नैसर्गिक गोष्टीचा वापर केला पाहिजे. क्रिस वोक्सने म्हटले होते की, देशात स्विंगसाठी मदत करणारा ड्यूूक चेंडू वापरला जातो.