27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडाएमा विम्बल्डनच्या दुस-याच फेरीत गारद

एमा विम्बल्डनच्या दुस-याच फेरीत गारद

एकमत ऑनलाईन

लंडन : युएस चॅम्पियन एमा राडुकानूला विम्बल्डन स्पर्धेत दुस-याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. कॅरोलिन ग्रासियाने तिचा ६-३, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढची फेरी गाठली. आपल्या घरच्या मैदानावर आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणा-या एमा राडुकानूने निराशा केली.

एमा ही जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर आहे. मात्र विम्बल्डनमध्ये तिला दुखापतींचा सामना करावा लागला. अशा स्थितीत ५५ व्या स्थानावर असलेल्या फ्रेंच केरोलिना ग्रासियाने तिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. १९ वर्षाच्या राडुकानूने पहिली सर्विस ब्रेक केल्यानंतर जोरदार पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर ग्रासियाने सामन्यावर आपली पकड मिळवली.

ग्रासिया सामन्यानंतर म्हणाली, एमा ही एक मोठी खेळाडू आहे. हे तिचे होम ग्राऊंड आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये ती चांगली कामगिरी करू शकते हे यापूर्वीच सिद्ध करून दाखवले आहे. मला सेंटर कोर्टवर खेळताना मजा आली. ही माझी सेंटर कोर्टवर खेळण्याची पहिलीच वेळ होती हे खूप खास आहे.

एमा राडुकानूने गेल्या वर्षी फ्लशिंग मेडोव्हजमध्ये थरारक विजय मिळवला होता. मात्र त्यावेळी तिला दुखापत झाली होती ती अजूनही बरी झालेली नाही. याचबरोबर तिला एक दीर्घकाळ प्रशिक्षक देखील मिळवण्यात अपयश येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या