34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeक्रीडाइंग्लंडचा भारतावर मोठा विजय

इंग्लंडचा भारतावर मोठा विजय

एकमत ऑनलाईन

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना मोठा रंगतदार झाला. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. अगदी सहज मॅच जिंकतील, अशी शक्यता असताना अचानक त्यांचे ३ फलंदाज बाद झाल्याने काही काळ उत्कंठा निर्माण झाली होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांनी संयम राखत सामना इंग्लंडला ६ गडी राखून जिंकून दिला. जॉनी बेअरस्टोने यावेळी शतक झळकावले. त भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली आणि संघाला सहजपणे विजय मिळवून दिला.

इंग्लंडविरुद्धच्या दुस-या वनडेत भारतीय फलंदाज के .एल. राहुल, ऋ षभ पंत व विराट कोहली यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. राहुलचे शानदार शतक व कर्णधार विराट कोहली आणि ऋ षभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ६ बाद ३३६ धावा केल्या.
दुस-या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार इयान मॉर्गन दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने जोस बटलरकडे कर्णधारपद देण्यात आले. भारताकडून के.एल. राहुल, विराट कोहली ऋ षभ पंतने मोठ्या खेळ्या केल्या. राहुलचे शतक, विराट व ऋ षभचे अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्याप्रमाणेच ३३६ असे मोेठे लक्ष्य इंग्लंडपुढे ठेवले.

काहीसे अवघड वाटणारे हे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरु केली. जॉनी आणि जेसन रॉय यांनी ११० धावांची सलामी देत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. जेसनने सुरुवातीपासून भारताच्या गोलंदाजीवर प्रहार करायला सुरुवात केली. त्यावेळी जॉनी हा संयतपणे फलंदाजी करत होता. पण यावेळी या दोघांकडून एक चुक झाली आणि चोरटी धाव घेण्याच्या नादात जेसन यावेळी बाद झाला. जेसन बाद झाल्यावर जॉनी आक्रमकपणे फलंदाजी करायला लागला. जॉनीने यावेळी उत्तुंग षटकार खेचत आपले शतक साकारले. शतक झळकावल्यावरही जॉनी आक्रमकपणे फलंदाजी करत राहीला. जॉनीला यावेळी बेन स्टोक्सची चांगली साथ मिळाली. बेन स्टोक्सही यावेळी शतक झळकावेल, असे वाटत होते. पण यावेळी फक्त एका धावेने स्टोक्सचे शतक हुकले. स्टोक्सने यावेळी ५२ चेंडूंत ४ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर तुफानी ९९ धावांची खेळी साकारली. जॉनी आणि बेन यांनी यावेळी दुस-या विकेटसाठी १७५ धावांची मोलाची भागीदारी रचली.

नांदेड जिल्ह्यात ९७0 बाधीत १४ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या