26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeक्रीडाइंग्लंडच्या जेम्सचा विक्रम, सचिनला टाकले मागे

इंग्लंडच्या जेम्सचा विक्रम, सचिनला टाकले मागे

एकमत ऑनलाईन

लंडन : इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला आहे. ३९ वर्षीय अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी टॉम लॅथमला बाद करून कसोटी क्रिकेटमधील आपली ६५० वी विकेट पूर्ण केली. क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज आहे. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनाही मागे टाकत आपल्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला आहे.

जेम्स अँडरसन वयाच्या ३० वर्षानंतर १०० कसोटी सामने खेळणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटीत मैदानावर उतरल्यावर त्याने ही कामगिरी केली. अँडरसनचा देशबांधव यष्टिरक्षक अ‍ॅलेक स्टीवर्ट या यादीत पहिला क्रमांकावर आहे, ज्याने वयाच्या ३० व्या वर्षापासून १०७ कसोटी सामने खेळले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या