28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home क्रीडा वॉर्नरच्या रजनीकांत अवतारावर चाहते फिदा

वॉर्नरच्या रजनीकांत अवतारावर चाहते फिदा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर याचं भारतप्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. बॉलिवूडच्या गाण्यांचं त्याला वेड आहे. बॉलिवूडच्या शीला की जवानी या प्रसिद्ध गाण्यावर त्याने डान्स केला होता. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने आपलं दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर असलेलं प्रेमदेखील दाखवून दिलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या बुट्टाबोम्मा गाण्यावर वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडीस थिरकली. त्यानंतर या दोघांनी अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या नैनु पक्का लोकल गाण्यावरही ताल धरला. आता त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांच्यावरील प्रेम दाखवून दिले आहे.

वॉर्नरने गेल्या काही दिवसांपासून रिफेस अ‍ॅपचा वापर करून काही बड्या सेलिब्रिटींच्या चेह-याच्या जागी स्वत:चा चेहरा लावलेले व्हीडीओ अपलोड केले आहेत. हॉलिवूडचा रॅम्बो , क्रिकेटपटू विराट कोहली अशा काही सेलिब्रिटीजचे चेहरे रिप्लेस करून तेथे स्वत:चा चेहरा लावलेले व्हीडीओ त्याने पोस्ट केले होते. तसाच, सुपरस्टार रजनीकांत यांच्या जागी स्वत:चा चेहरा लावलेला एक व्हीडीओ त्याने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अपलोड केला. रजनीकांतच्या एका गाण्यावर त्याची वेगवेगळी रूपं दाखवण्यात आली आहेत. त्याच व्हीडीओत रजनीकांतच्या जागी वॉर्नरने स्वत:चा चेहरा पेस्ट केला आहे.

या व्हीडीओखाली त्याने कॅप्शन लिहीले आहे, माझ्या अनेक चाहत्यांनी रजनीकांत यांच्यासंबंधीचा व्हीडीओ पोस्ट करण्याची मागणी केली होती. नववर्षाचं निमित्त साधून हा व्हीडीओ . हा व्हीडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. २४ तासांच्या आतच लाखो युजर्सनी हा व्हीडीओ लाईक केला आहे. १.८० मिलियन लोकांनी व्हीडीओ पाहिला आहे तर २७ हजारांहून अधिक चाहत्यांनी त्यावर कमेंट केली आहे.

 

हस्तरा येथे कारवाईच्या आधीच माफियांकडून रेती लंपास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या