मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या इरफान पठाणने आता कॉमेंट्रीमध्ये आपली नवी इनिंग सुरू केली आहे. या दरम्यान एका महिला चाहती स्टेडियमबाहेर इरफानला ‘पठाणों के पठाण ’ अशा आशयाचे पोस्टर घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. इरफानने २०२० मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. डावखुरा वेगवान गोलंदाज इरफानने वयाच्या १९ व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केले.
दरम्यान, एका महिला चाहतीने स्टेडियमबाहेर इरफान पठाणच्या नावाचे पोस्टर हातात घेतले होते. मात्र, इरफानने त्याला निराश केले नाही आणि त्याने चाहत्यांसोबत फोटो काढले. या चाहतीने हातात ‘पठाणो के पाठण इरफान पठाण’ असे कॅप्शन लिहिले पोस्टर घेतले होते. त्यावर हार्ट देखील काढले होते.
त्याने २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२०आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्या वयात इरफानने आपल्या कारकिर्दीतून निवृत्ती घेतली त्या वयात अनेक खेळाडू क्रिकेट खेळत आहेत, मात्र असे असूनही इरफानची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही.
खरं तर, इरफान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर – गावसकर कसोटी मालिकेसाठी ंिहदी समालोचन पॅनेलचा सदस्य आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना नागपुरात झाला. या सामन्यात टीम इंडियाने तिस-या दिवशी लंचनंतर एक डाव आणि १३२ धावांनी सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
इरफान पठाणने २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून, त्याने भारतासाठी २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२०आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने आपल्या सर्वोत्तम गोलंदाजीने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये १०० विकेट्स आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२८ बळी घेतले.