नागपूर : नागपूर आणि दिल्ली कसोटीत फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाला अडकवणा-या भारतीय संघाने इंदूरमधील तिस-या कसोटीतही टाकलेला हा फास बूमरँग झाला. तिस-या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी मैदानावर एक रंजक घटना घडली.
खेळ सुरू होण्यापूर्वी स्टार स्पोर्टस्चे अँकर जतीन सप्रू यांच्यासह माजी फिरकीपटू हरभजन सिंग आणि संजय मांजरेकर सामन्याचे विश्लेषण करत होते. त्यानंतर रवींद्र जडेजाही तेथे पोहोचला व त्याने संजय मांजरेकर यांना मिठी मारत वाद मिटवला.
दरम्यान, रवींद्र जडेजा आणि संजय मांजरेकर यांच्यात बरेच दिवस शाब्दिक युद्ध सुरू होते. एकेकाळी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनीही त्यांना रिटेल क्रिकेटर म्हटले होते. ज्यावर बराच गदारोळ झाला होता त्यानंतर हरभजन व जतिन सप्रूच्या मध्यस्थीने अखेर जडेजाचा मांजरेकर यांच्याशी वाद मिटला.
जडेजाने प्रथम जतिन सप्रू आणि हरभजन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केले, त्यानंतर तो संजय मांजरेकर यांना मिठी मारताना दिसला. व्हीडीओमध्ये जडेजा आणि मांजरेकर एकमेकांशी बोलतानाही दिसत होते.