22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात मोठे संकट उभारले असून, अनेक देश मदतीसाठी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेदेखील मदतीचा हात दिला आहे.

कोरोनाविरोधातील लढ्याला बळकटी देण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन आणि यूनिसेफच्या सहकार्यातून भारतासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी प्रारंभिक रूपात ५० हजार डॉलरची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया बोर्डाने ट्विट करत दिली आहे. तसेच भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियातील नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे.

ऑस्ट्रेलिया बोर्डाचे सीईओ निक हॉकले म्हणाले, कोरोनाच्या दुस-या लाटेत आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आमच्याकडून शक्­य होईल तितकी मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तसेच भारतातील नागरिकांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात १६ जिल्ह्यांत ऑक्सिजन तुटवडा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या