नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व आर्थिक संकटात सापडले आहे. टेनिसही त्याला अपवाद नाही. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, सेरेना विल्यम्स यांसारख्या टेनिसपटूंची कमाई नेहमीच चर्चेचा विषय असते. मात्र या खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणेच जगभरातील अन्य टेनिसपटूंची स्थिती कोरोनामुळे वाईट बनली आहे. कोरोनामुळे टेनिसविश्व ठप्प असताना सर्वाधिक आर्थिक फटका खालच्या क्रमवारीवर असणाºया टेनिसपटूंना बसणार आहे.
आॅस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन, अमेरिकन या वर्षांतील चार ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या विजेत्यांची बक्षीस रक्कम ही क्रीडा जगतात नेहमीच चर्चेचा विषय असते. त्याच जोडीला ग्रँडस्लॅम आणि अन्य प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीपासूनच खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम ठरलेली असते. याचा फायदा ग्रँडस्लॅममध्ये पात्र ठरलेल्या कमी क्रमवारी असणाºया खेळाडूंना होतो. ग्रँडस्लॅमप्रमाणेच एटीपी, डब्ल्यूटीए, फेड चषक, डेव्हिस चषक या टेनिस स्पर्धांमध्ये खेळूनही खालच्या क्रमवारीतील खेळाडू बºयापैकी कमाई करत असतात. किंबहुना या स्पर्धा खेळूनच त्यांना टेनिसमध्ये टिकाव धरणे शक्य होते. मात्र कोरोनामुळे गेले तीन महिने टेनिसविश्वही ठप्प आहे. पुन्हा कधी टेनिस स्पर्धा सुरू होतील, हे कुणीच सांगू शकत नाही. अशा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तळाच्या क्रमवारीतील टेनिसपटूंची आता आपली कारकीर्द वाचवण्यासाठीची धडपड सुरू झाली आहे.
Read More कोरोना शुल्क हटवण्याचा निर्णय : दिल्लीत आता दारू स्वस्त होणार
रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविच, स्टॅनिस्लास वावरिंका यांसारख्या अव्वल टेनिसपटूंनी खालच्या क्रमवारीतील खेळाडूंना आर्थिक मदत द्यायला हवी, याकडे सातत्याने लक्ष वेधले आहे. या चारही अव्वल खेळाडूंचा एकमेकांशी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवरून जाहीर संवाद झाला होता. त्यामध्ये या खेळाडूंनी अव्वल १०० वगळता उर्वरित खेळाडूंना कठीण काळात आर्थिक मदत मिळाली पाहिजे, याकडे लक्ष वेधले होते. हे सर्व विचारात घेता, अखेर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) ५०० ते ७०० दरम्यान क्रमवारी असणाºया टेनिसपटूंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. एकेरी आणि दुहेरीत खेळणाºया टेनिसपटूंना ही आर्थिक मदत त्यांच्या राष्ट्रीय महासंघांद्वारे देण्याचा निर्णय ‘आयटीएफ’ने घेतला आहे. या मदतीसाठी ग्रँडस्लॅम आयोजक देश यांनीही योगदान दिले आहे. जोकोविचसह अव्वल खेळाडूंनी मिळून ६० लाख अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक रक्कम जमा केली. ही सर्व रक्कम ८०० खेळाडूंना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘आयटीएफ’ने केली मदत जाहीर
पुरुषांच्या आणि महिलांच्या एकेरीमध्ये ५०० ते ७०० क्रमवारीतील खेळाडूंना ज्याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे तसेच दुहेरीतील १७५ ते ३०० क्रमवारीतील खेळाडूंना मदत करण्यात येणार आहे. ही मदत राष्ट्रीय महासंघांद्वारे पात्र खेळाडूंना मिळेल. ‘आयटीएफ’ला २०० नंतरची क्रमवारी असणाºया खेळाडूंनाही आर्थिक मदत द्यायची होती. मात्र सद्य:स्थितीत ५०० क्रमवारीपुढील खेळाडूंना ही आर्थिक मदत आहे, असे ‘आयटीएफ’कडून स्पष्ट करण्यात आले. ही आर्थिक मदत सध्या प्रत्येक खेळाडूमागे २००० अमेरिकन डॉलरची आहे.