22.5 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home क्रीडा उडता पंजाब अन् बुडता बंगळुरू

उडता पंजाब अन् बुडता बंगळुरू

एकमत ऑनलाईन

पहिल्या सामन्यात हैदराबाद विरूद्ध दहा धावाची विजयी सलामी देणा-या बंगळुरूचा उडता पंजाबन बुडता बंगळुरू करत विजयीश्री मिळवली. पहिल्याच सामन्यात दिल्लीने सुपर ओवरमध्ये पंजाबचा निसटता पराभव केला होता. लोकेश राहुलच्या उच्चांकी खेळीनंतर फिरकी गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या तेराव्या पर्वात गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा विजय लिहिला गेला. त्यांनी दुुुबईच्या मैैैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा ९७ धावांनी पराभव केला. खरं तर या बड्या मोठ्या पराभवामुळे बंगलोरचे जहाज बुडण्याच्या मार्गावर आहे ते कसे तरेल हा फार मोठा प्रश्न. त्यांची सरासरी -२.१७५ आहे त्यामुळे पहिल्या चारात बंगलुरुला येण हे अशक्यप्राय आव्हान कोहलीसमोर असेल.

कोहलीने नाणेफेक जिंकून पंजाबला पाचारण केले. प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर पंजाबने ३ बाद २०६ धावा केल्या. यात लोकेश राहुलच्या वैयक्तिक खेळीचा वाटा होता. त्याने ६९ चेंडूंत १३२ धावांची नाबाद खेळी करताना आयपीएलमधील भारतीय वैयक्तिक सर्वोच्च खेळी केली. यापूर्वी १२२ धावांची सर्वोच्च खेळी विरेंद्र सेहवागच्या नावावर होती. त्याने २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच ही खेळी केली होती.बंगळूरूच्या ख्रिस गेल १७५ धावा पुणे वॉरियर्स विरुद्ध २०१३ च्या आयपीएल स्पर्धेत केल्या होत्या त्यात १७ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता तर ३० चेंडूत शतक पूर्ण केले होते. बंगळूर संघाला लोकेश राहुलची वैयक्तिक धावसंख्याही गाठता आली नाही. १७ षटकांत त्यांचा डाव १०९ धावांत आटोपला. पंजाबच्या रवी बिष्णोई आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या आव्हानाचे दडपण बंगळूरच्या सलामीच्या जोडीवर सुरवातीपासूनच होते. पहिल्या तीन षटकांतच त्यांनी ४ धावांत ३ फलंदाज गमावले. त्यानंतर ९ षटकातंच त्यांनी निम्मा संघ ५७ धावांत गमावला होता. अरॉन फिंच (२०), विराट कोहली (०), एबी डिव्हिलर्स (२८) या प्रमुख फलंदाजांचा त्यात समावेश होता. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (३०) वगळता त्यांचा एकही फलंदाज गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. रवी बिष्णोईने पहिले षटक तुलनेत महाग टाकले. पण, त्यानंतर त्याने आपल्या गुगलीने बंगळूरच्या फलंदाजांना नाचवले. त्याने ३ गडी बाद केले. मुरुगन अश्विन आणि बदली म्हणून आणलंल्या ग्लेन मॅक्सवेल या फिरकी गोलंदाजांनीही बंगळूरच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचे काम चोख बजावले.

त्यांचा डाव संपुष्टात आणण्याची औपचारिकता मग पंजाबच्या गोलंदाजांनी पार पाडली. वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी बंगळूरला शंभरी गाठवली. पंजाब संघाच्या २० षटकांतील ३ बाद २०६ धावसंख्येनंतर विराट कोहलीला नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी दिल्याचा नक्कीच पश्चाताप झाला असेल. मयांक अगरवाल आणि कर्णधार लोकेश यांनी पंजाबला आश्वासक सुरवात करून दिली. सात षटकांत त्यांनी ५७ धावांची सलामी दिली. युजवेंद्र चहल आणि शिवम दुबे टिच्चून मारा करत होते. युजवेंद्रला यावेळी यश मिळाले नाही. निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांना त्याने बाद केले. राहुल दुस-या बाजूने बंगळूरच्या गोलंदाजां इतकाच टिच्चून फलंदाजी करत होता.

पंजाबच्या डावाची गाडी सुसाट सुटली होती. अखेरच्या पाच षटकांत मॅक्सवेलची विकेट पडूनही त्यांनी ८० धावांची भर घातली. राहुलला वैयक्तिक ८३ आणि ८९ धावांवर जीवदान दिल्याचा फटकाही बंगळूरला बसला. विशेष म्हणजे दोन्ही झेल विराट कोहलीनेच सोडले. दुसरा झेल सोडल्यावर राहुलने १४ चेंडूंत ४३ धावांची भर घातली. त्यामुळे जेथे पंजाबचे आव्हान १७० धावांपर्यंत मर्यादित राहायचे ते दोनशेच्या पुढे गेले. राहुलने ९० धावा ६० चेंडूंत केल्या होत्या. त्यानंतर त्याने ४३ धावा ९ चेंडूंत घेतल्या. राहुलने.६९ चेंडूंत १४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १३२ धावांची कर्णधाराची खेळी केली. अखेरच्या दोन षटकांत राहुलने करुण नायरच्या साथीत ४९ धावा कुटल्या.

मैदानाबाहेरून
डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या