24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाफुटबॉलपटू सुनील छेत्रीचा राज्यपालांनी केला अपमान

फुटबॉलपटू सुनील छेत्रीचा राज्यपालांनी केला अपमान

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्री याचा एक व्हीडीओ समोर आला असून एका कार्यक्रमात त्याला राज्यपालांनी बाजूला ढकलल्याचे या व्हीडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान हा व्हीडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन यांच्याविरोधात सुनीलचा अपमान केल्याने सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, सुनील छेत्री आणि त्यांच्या संघाने डुरांड कप जिंकला होता. त्यावेळी त्यांना ट्रॉफी देण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन बक्षीस वितरणावेळी सुनील छेत्री याला बाजूला ढकलून स्वत: पुढे आले. एका फोटोसाठी फुटबॉलपटूचा अपमान करणे त्यांना शोभत नाही, अशा शब्दांत नेटक-यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, बंगळुरू एफसीने रविवारी येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर मुंबई सिटी एफसीचा २-१ असा पराभव करत ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री याने पहिल्या ड्युरंड कपवर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला असून अनेक क्षेत्रांतून संताप व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या