20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeक्रीडामंगळवारपासून सुरू होणार कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम

मंगळवारपासून सुरू होणार कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला २७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लीग ए डिव्हिजन सामन्यांनी छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर ​हंगामाला सुरुवात होईल. लीग अंतर्गत नोंदणीकृत १६ संघांचे सिनियर सुपर- ८ व सिनियर-८ या दोन गटांतर्गत एकूण ५६ सामने होणार आहेत.

दररोज दोन सामने होतील. अनुचित प्रकार टाळण्यासाठी ​स्टेडियमम​ध्ये व प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही ​कॅमेरे लावण्यात आले आहेत. पहिल्या फेरीतील पहिला सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ अ यांच्यामध्ये दुपारी २ वाजता तर श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यामध्ये संध्याकाळी ४ वाजता होईल. दरम्यान, फुटबॉल महासंग्रामकडून कोल्हापूर फुटबॉलला शिस्त लागावी यासाठी फुटबॉल भूषण सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

केएसए लीग व सर्व स्पर्धा संपल्यानंतर फुटबॉल खेळाडूंचा आणि संघांचा फुटबॉल भूषण सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडू या सर्वांसाठी पात्र असतील. जिल्ह्याबाहेरील एकाच खेळाडूला स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. तज्ज्ञ समितीकडून फुटबॉल भूषण सन्मानासाठी निवड होईल.

सर्वोत्तम संघ, शिस्तबद्ध संघ, प्लेयर ऑफ द इयर, उदयोन्मुख खेळाडू, सर्वोत्तम फॉरवर्ड, सर्वोत्तम हाफ, सर्वोत्तम डिफेन्स, सर्वोत्तम गोलकीपर, सर्वोत्तम जिल्ह्याबाहेर खेळाडू, सर्वोत्तम प्रशिक्षक, सर्वोत्तम संघ व्यवस्थापक, सर्वोत्तम स्पर्धा संयोजक, सर्वोत्तम क्रीडा वार्तांकन, सर्वोत्तम क्रीडा छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्वोत्तम पंच, सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ समर्थक अशा विभागात पुरस्कार दिले जाणार आहेत.

फुटबॉल भूषण जीवन गौरव पुरस्कारही घोषित केला जाणार आहे. फुटबॉल भूषण मानांकन साठी निवड समितीने नियमावली केली आहे. २०२२ आणि २०२३ या वर्षातील केएसए लीग व सीनियर संघाचा सर्व स्पर्धांतील सहभाग नोंदणीकृत खेळाडूला पुरस्कार देण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या