36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeक्रीडाकॉमेंट्रीदरम्यान माजी क्रिकेटपटू गावस्कर यांनी केली आक्षेपार्ह टिप्पणी

कॉमेंट्रीदरम्यान माजी क्रिकेटपटू गावस्कर यांनी केली आक्षेपार्ह टिप्पणी

एकमत ऑनलाईन

अबुधाबी : माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्या टीपणीवर कर्णधार विराट कोहलीचे चाहते संतापले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात कोहली अपयशी ठरला. त्यामुळे गावस्करांनी कॉमेंट्रीदरम्यान आक्षेपार्ह टीपणी केल्याने सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने गावस्कर यांना कॉमेंट्री करण्यास मज्जाव करावा अशी मागणीही विराटच्या चाहत्यांकडून केली जात आहे. तसेच टि्वटरवरही गावस्कर यांच्यावर प्रचंड टीकाही होत असल्याचं पाहायला मिळतंय.

पंजाबविरुद्ध गुरुवारी ( 25 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात कोहलीच्या बंगळुरुला हार पत्कारावी लागली. या सामन्यात विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. कोहली फलंदाजीतही पुरता अपयशी ठरला. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करताना विराटने पंजाबचा कर्णधार आणि शतकवीर के एल राहुलचे दोन झेलही सोडले.

या सामन्यात राहुलने तब्बल 132 धावांची नाबाद शतकी खेळी करत बंगळुरुसमोर 206 धावांचे तगडे आव्हान उभे केले. पहिल्यांदा झेल सोडला तेव्हा राहुल 83 धावांवर खेळत होता. तर विराटने दुसऱ्यांदा झेल सोडला तेव्हा राहुलने 89 धावा केल्या होत्या. हे दोन्ही झेल विराटने सोडले नसते तर लोकेश राहुल 132 धावा करुच शकला नसता, असा सूर किक्रेट प्रेमींकडून आळवण्यात येतोय. त्याबाबत बोलताना गावस्कर यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली.

टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय

सुनील गावस्कर हे कॉमेंट्रीदरम्यान विराटच्या खेळीबद्दल बोलत होते. त्याच्या खेळीची मिमांसा करताना त्यांनी विराट-अनुष्काबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली. ‘विराटने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला’ त्यांच्या या टिप्पणीमुळे विराटचे चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान, गावस्कर यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय, असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत. लॉकडाऊनमध्ये विराट पत्नी अनुष्कासोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुनील गावस्कर याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन बोलले असतील असंही म्हटलं जातंय.

पंढरपुरात धनगर समाजाचे ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या