21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडामाजी क्रिकेटपटू विनू माकंड यांना हॉल ऑफ फेममध्ये स्थान

माजी क्रिकेटपटू विनू माकंड यांना हॉल ऑफ फेममध्ये स्थान

एकमत ऑनलाईन

लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)जाहीर केलेल्या या वर्षीच्या स्पेशल एडिशन ‘हॉल ऑफ फेम’ सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या १० दिग्गज खेळाडूंमध्ये भारताचे माजी फिरकीपटू विनू माकंड यांचा समावेश केला आहे. भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल आयसीसीने विनू माकंड यांचा सन्मान केला आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा सन्मान करण्यासाठी आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी आयसीसी हॉल ऑफ फेम क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमूल्य योगदान दिलेल्या माजी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले असून, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावीत अशी १० खेळाडूंची नावे जाहीर करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. हॉल ऑफ फेम यादीत आणखी १० नावे समाविष्ट झाली असून हा सन्मान मिळालेल्या एकूण खेळाडूंची संख्या आता १०३ इतकी झाली आहे.

नाल्यात वाहुन गेल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; वृद्धास वाचविण्या ऐवजी अनेकांनी केला व्हिडीओ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या