25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडानेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाला अटक ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार...

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाला अटक ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछा याला काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

लामिछाने याआधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते, मात्र नंतर त्यांनी आत्मसमर्पण करण्याचे मान्य केले. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर संदीपने नेपाळ सोडले होते. पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यानंतर आपण आत्मसमर्पण करण्यास तयार असून ६ ऑक्टोबर रोजी देशात परतणार असल्याचे त्याने सांगितले.

आपल्या स्पष्टीकरणात लामिछाने फेसबुकवर लिहिले आहे, मी मोठ्या आशेने आणि ताकदीने पुष्टी करतो की मी ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नेपाळला पोहोचत आहे. खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी नेपाळचा नागरिक म्हणून घोषित करतो.

मी अधिका-यांना सुपुर्द करीन. मी निर्दोष आहे आणि न्यायव्यवस्थेवर माझा अढळ विश्वास आहे याचा मी पुनरुच्चार करतो. माझा कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे. मला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या