कोलकाता : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने सध्याच्या खेळाडूंच्या पगारासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. सध्याच्या खेळाडूंपेक्षा कुंबळे, द्रविड, गावस्कर यांनी कमी पैसे कमवले खेळ चांगला दाखवला असे विधान गांगुलीने केले आहे. त्याच्या या विधानामुळे क्रिकेट जगतात चांगलीच खळबळ माजली आहे.
आयपीएलचे मीडिया हक्क विकल्यानंतर गांगुलीने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. परफॉर्मन्सशी पैसा जोडला जाऊ शकत नाही. सुनील गावसकर ते अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांच्या काळापासून आज खेळाडू जे काही कमावत आहेत, त्यांना पैसा महत्त्वाचा नव्हता. पण त्या सर्वांना परफॉर्म करण्याची भूक होती. खेळाडू केवळ पैशासाठी खेळत नाही, तर तो त्याच्या पातळीवर खेळतो आणि भारताचे प्रतिनिधित्व केल्याचा त्याला अभिमान वाटतो. असे मत गांगुलीने यावेळी व्यक्त केले.
आयपीएल २०२३ ते आयपीएल २०२७ पर्यंत मंगळवारी अखेर बीसीसीआयने स्पर्धेचे मीडिया अधिकार विकले. मात्र यावेळच्या कमाईच्या आकड्यांने सा-यांचेच डोळे विस्फारले आहेत. बीसीसीआयने हे मीडिया अधिकार तब्बल ४८,३९० कोटी रूपयांना विकले आहेत. यातून होणा-या कमाईचे विविध पैलू आणि आकडेवारी समोर आल्यानंतर सारेच हैराण झालेत.