27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home क्रीडा माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले

माजी रणजीपटू शेखर गवळी ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळले

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिकच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडाविश्वाला चटका लावणारी घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इगतपुरीतील मानस हॉटेलपाठीमागच्या परिसरातील डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी गेलेल्या ग्रुपमधील महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि माजी रणजीपटू शेखर गवळी हे खोल दरीत कोसळले आहेत. त्यांना शोधण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र, अंधार आणि खोलदरी तसेच, २५० ते ३०० फूट डोहामुळे शोधकार्यात अनेक अडचणी आल्या आणि अखेर शोध थांबवावा लागला.

उद्या म्हणजेच बुधवारी (दि. २) पहाटे ५ वाजेपासून पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे. दरम्यान, गवळी यांनी नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वात वेगळी छाप सोडली आहे. ट्रेकिंग, योगा, फिटनेस, व्यायामाचा छंद असल्याने ते सातत्याने आपला छंद जोपासण्यासाठी विविध ठिकाणी ट्रेकिंगसाठी जात असतात. मंगळवारी ते इगतपुरीनजिकच्या एका डोंगररांगेत ट्रेकिंगसाठी काही सवंगड्यांसमवेत गेले होते.

मात्र, या दरम्यान त्यांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळल्याचे समजते. यानंतर ते एका खोल डोहात पडल्याने इगतपुरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन टिमसह शोधकार्य केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत अपयशच आले. त्याठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याचे अनेकजण सांगतात. त्यांचा मित्र परिवार इगतपुरीकडे निघाल्याचे समजते. आप्तेष्टांनीही इगतपरीकडे धाव घेतली आहे. मात्र, घटना नेमकी काय घडली याचे उत्तर पोलिसांकडे अद्यापही नसून चौकशी सुरू आहे.

नाशिकच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनीही या घटनेची माहिती मिळताच नोंद घेत तपासाच्या सूचना केल्या. महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर आणि प्रसिद्ध योगा प्रशिक्षक म्हणून त्यांची राज्यभरात ख्याती आहे. त्यामुळे या घटनेमुळे राज्यभरातील क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

तरुणांना भाषण नको आहे, नोकऱ्या पाहिजे-प्रियंका गांधी

ताज्या बातम्या

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

आणखीन बातम्या

शेरास सव्वाशेर, राजस्थान जिंकले

शारजा : राहुल टेवाटियाचे एकाच षटकातील ५ षटकारांसह वेगवान अर्धशतक, स्टिव्हन स्मिथ, संजू सॅमसनचे झंजावाती अर्धशतक याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शेरास सव्वाशेर उत्तर देत...

कोलकाताने गुणांचे खाते उघडले

सुरेख गोलंदाजी आणि शुभमन गिलच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या तेराव्या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी शनिवारी अबुधाबी येथे झालेल्या...

कोलकाताची हैदराबादवर मात; युवा क्रिकेटपटू शुबमन गिलची फटकेबाजी

अबुधाबी : युवा क्रिकेटपटू शुबमन गिलची फटकेबाजी आणि अनुभवी मॉर्गनने त्याला दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पहिला विजय मिळवला. कोलकाताने सनराईजर्स...

दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय

दुबईत : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने दिलेली ९४ धावांची दमदार सलामी आणि ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकी भागादारी याच्या जोरावर...

उडता पंजाब अन् बुडता बंगळुरू

पहिल्या सामन्यात हैदराबाद विरूद्ध दहा धावाची विजयी सलामी देणा-या बंगळुरूचा उडता पंजाबन बुडता बंगळुरू करत विजयीश्री मिळवली. पहिल्याच सामन्यात दिल्लीने सुपर ओवरमध्ये पंजाबचा निसटता...

कॉमेंट्रीदरम्यान माजी क्रिकेटपटू गावस्कर यांनी केली आक्षेपार्ह टिप्पणी

अबुधाबी : माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्या टीपणीवर कर्णधार विराट कोहलीचे चाहते संतापले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात कोहली...

गोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला

दुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...

मुंबईचा वाळवंटातील पहिला विजय

रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या खडूस कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १३व्या पर्वात अबूधाबी येथील पाचव्या सामन्यात बुधवारी कोलकता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी...

षटकारांची आतषबाजी

शारजाच्या छोटया मैदानाचा फायदा घेत फलंदाजांनी केलेल्या षटकारांच्या आतषबाजीत रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वातील चौथ्या सामन्यात राजस्थानने तगड्या चेन्नई संघाचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...