23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडामाजी अंपायर रूडी कर्टझन यांचे कार अपघातात निधन

माजी अंपायर रूडी कर्टझन यांचे कार अपघातात निधन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयसीसीचे माजी अंपायर रूडी कर्टझन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेचे माजी अंपायर यांचे अपघातात निधन झाले आहे. रूडी यांच्याबरोबरच इतर तीन जणांची रस्ते अपघातात समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही घटना मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या रिडरडेल भागात घडली. रूडी हे एक आयसीसीचे सर्वोकृष्ट अंपायर पैकी एक होते. त्यांना ३३१ सामन्यांचा अंपयरिंगचा अनुभव होता.

रूडी यांनी १९९२ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथील दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापासून आपल्या अंपयरिंग कारकिर्दिला सुरूवात केली होती. त्याने रेकॉर्ड २०९ वनडे आंतरराष्ट्रीय १४ टी २० सामन्यात अंपायरिंग केली आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील १९९९ मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या सामन्यात त्यांनी स्मरणीय अंपायरिंग केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या