24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडामाजी विकेट किपर पार्थिव पटेलच्या वडिलांचे निधन

माजी विकेट किपर पार्थिव पटेलच्या वडिलांचे निधन

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीम इंडियाचा माजी विकेट किपर पार्थिव पटेलच्या वडिलांचे निधन झाले आहे. पार्थिवनं ट्विट करत याची माहिती दिली आहे. पार्थिवचे वडील अजयभाई पटेल यांना दोन वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. ही झुंज अखेर अपयशी ठरली. ‘मला हे कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, माझे वडील अजयभाई बिपिनचंद्र पटेल हे २६ सप्टेंबर रोजी आपल्याला सोडून गेले आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी अशी आम्ही विनंती करतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम नम: शिवाय’ असे ट्विट करत पार्थिवने याबाबतची माहिती दिली आहे.

‘पार्थिव पटेलने २०१८ साली एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली होती. तेव्हा तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा सदस्य होता. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर मोबाईल चेक करत असताना वडिलांच्या काळजीने आपल्याला सतत भीती वाटत असे. वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर आपण दहा दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, घरीही गेलो नव्हतो,’ असे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या