30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeक्रीडासीएसकेविरुद्ध गब्बर शिखर धवनचे मोठे रेकॉर्ड

सीएसकेविरुद्ध गब्बर शिखर धवनचे मोठे रेकॉर्ड

एकमत ऑनलाईन

मुंबई : या आयपीएल स्पर्धेत विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सुरुवात जोरदार केली आहे. मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा सात विकेट्सनी पराभव केला. टीम इंडियाचा गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेला शिखर धवनने या मॅचमध्ये एक मोठे रेकॉर्ड केले आहे.

धवनने मागील आयपीएलमधील फॉर्म या सिझनमध्येही कायम ठेवला. त्याने दिल्लीकडून सर्वांत जास्त ८५ धावा काढल्या. धवनने या धावा ५४ बॉलमध्ये १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने काढल्या. यावेळी आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ६०० फोर मारणारा धवन हा पहिला बॅट्समन ठरला आहे. धवनने १७१ आयपीएल इनिंगमध्ये ६०१ फोर लगावले आहेत. या यादीमध्ये डेव्हिड वॉर्नर दुस-या क्रमांकावर आहे. त्याने १४२ इनिंगमध्ये ५१० फोर लगावले आहेत.

विराटला टाकले मागे
शिखर धवनने या खेळीच्या दरम्यान आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला देखील मागे टाकले आहे. धवन आता चेन्नईविरुद्ध सर्वांत जास्त रन करणारा बॅट्समन बनला आहे. त्याने चेन्नईविरुद्ध ९१० रन काढले आहेत. विराट कोहली या यादीत दुस-या क्रमांकावर असून त्याच्या नावावर ९०१ रन आहेत. आयपीएलच्या मागच्या मोसमात दिल्लीची टीम फायनलपर्यंत पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात त्यांचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. दिल्लीचा पुढील सामना आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध १५ एप्रिल रोजी होणार आहे.

शासकीय दरानेच सीटी स्कॅन करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या