22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeक्रीडाऑरेंज कॅप रेसमध्ये गब्बरची एन्ट्री

ऑरेंज कॅप रेसमध्ये गब्बरची एन्ट्री

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब किंग्जचा धडाकेबाज सलामी फलंदाज शिखर धवन ऊर्फ गब्बरने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७० धावा ठोकून ऑरेंज कॅप रेसमध्ये टॉप तीनमध्ये जागा मिळविली आहे. धमाकेदार इनिंग खेळताना शिखरने आतापर्यंत १९७ धावा ठोकून ऑरेंज कॅप रेसमध्ये तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. आता त्याच्या पुढे फक्त राजस्थान रॉयल्सचा सलामी फलंदाज जोस बटलर व चेन्नई सुपरकिंग्जचा शिवम दुबे आहेत. बटलर २१८ धावांसह टॉप पोझिशनवर आहे तर शिवम २०७ धावांसह दुस-या स्थानावर आहे.

ऑरेंज कॅप रेसमध्ये पहिल्या पाचमध्ये शिखर नंतर रॉबिन उत्थप्पा १९४ धावा व क्विंटन डी कॉक १८८ धावांसह चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. नुकत्याच खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव याने ४३ धावा काढून ऑरेंज कॅप टॉप १० मध्ये जागा मिळविली आहे. मात्र पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सला सलग पाचवा पराभव स्वीकारावा लागला आहे आणि टेबल पॉईंटमध्ये त्यांची जागा शेवटी म्हणजे दहावी आहे. आतापर्यंत हा संघ एकही विजय मिळवू शकलेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या