26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडा'सुपरस्टार टीम' म्हणत गंभीरने फडकावला लंकेचा झेंडा

‘सुपरस्टार टीम’ म्हणत गंभीरने फडकावला लंकेचा झेंडा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : श्रीलंकेने पाकिस्तानला मात दिल्यानंतर फक्त श्रीलंकेतच नाही तर भारतात देखील आनंदाचे वातावरण आहे. श्रीलंकेच्या बाऊन्स बॅकची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर, समोलोचक, भाजपचा खासदार गौतम गंभीर देखील श्रीलंकेच्या संघावर जाम खूष होता. त्याने तर श्रीलंकेचा झेंडा हातात घेत ‘सुपरस्टार टीम… खरे हक्कदार! अभिनंदन श्रीलंका.’ असे म्हणत आपल्या भावना मैदानावरच व्यक्त केल्या.

श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लंकेच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली. आशिया कपच्या सुरूवातीला श्रीलंका विजेतेपदाची दावेदार नव्हती. मात्र त्यांना जोरदार मुसंडी मारत विजेतेपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यानंतर श्रीलंकेच्या चाहत्यांनी जल्लोष केला. या जल्लोषात समालोचक गौतम गंभीर देखील सामिल झाला.

त्याने श्रीलंकेचा झेंडा हातात घेत तो श्रीलंकेच्या चाहत्यांना दाखवला. लंकेच्या चाहत्यांच्या आनंद गगनात मावत नव्हता. हा व्हिडिओ शेअर करत गौतम गंभीरने त्याला ‘सुपरस्टार टीम… खरे हक्कदार! अभिनंदन श्रीलंका.’ असे कॅप्शन दिले.

प्रथम फलंदाजी करणा-या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली होती. पाकिस्तानच्या प्रभावी मा-यासमोर श्रीलंकेची अवस्था ५ बाद ५८ अशी झाली. मात्र त्यानंतर भानुका राजापक्षेने ४५ चेंडूत नाबाद ७१ धावांची दमदार खेळी केली. त्याला हसरंगाने ३६ धावा करून चांगली साथ दिली. या जोरावर श्रीलंकेने २० षटकात १७० धावांपर्यंत मजल मारली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या