31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्रीडागांगुली स्वत:ला शहाणा समजतो

गांगुली स्वत:ला शहाणा समजतो

माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे मत

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली नेहमी त्याच्या जबाबदा-या चोखपणे पार पडताना दिसतो. संघाची निवड, आयपीएल वेळापत्रक, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेंविषयीचे काही निर्णय अशा ब-याच गोष्टीत तो स्वत: लक्ष घालत असतो. त्यामुळे त्याच्या सक्रियतेची कित्येक माजी क्रिकेटपटू प्रशंसा करत असतात. परंतु माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर हे गांगुलीच्या सक्रियतेवर खुश नाहीत.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा आयपीएल सामन्यांच्या दिनांक, स्थान अशा गोष्टींवर चर्चा होऊ लागली होती, तेव्हा गांगुली आयपीएलचा अध्यक्ष असल्याप्रमाणे बोलत होता. हे खूप दु:खद आहे. गांगुली इतरांच्या वतीने बोलून स्वत: बद्दलची विश्वसनीयता कमी करत आहे. त्याला असे तर म्हणायचे नाही ना की, त्याला इतरांपेक्षा जास्त गोष्टींचे ज्ञान आहे. माझ्या मते क्रिकेट हा माजी खेळाडूंद्वारे चालवला जाणारा खेळ आहे. मला गांगुलीकडून खूप अपेक्षा होत्या. पण आता त्याच्या वागणूकीला पाहून माझे मन बदलू लागले आहे.

तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याला आयपीएल दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला येत्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर संधी देण्यात आली नव्हती. परंतु, आता तो दुखापतीतून सावरल्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.

याविषयी बोलताना वेंगसरकर म्हणाले की, भारतीय संघाची निवड समिती किंवा बोर्डातून कुणीही रोहित शर्माच्या फिटनेसविषयी वक्तव्य केले नव्हते. परंतु गांगुलीने एकट्याने या गोष्टीची पुष्टी दिली होती की, रोहित लवकर बरा झाला तर तो फ्लाइटमध्ये असेल. पण आतापर्यंत जे घडले ते नक्की काय होते?. बीसीसीआयच्या फिजिओने रोहितला दुखापत झाल्याचे सांगत भारतीय संघात निवडले नाही, तर दूस-या बाजूला मुंबई इंडियन्सचे फिजिओ त्याला आयपीएल सामने खेळू देत आहेत. दोन फिजिओंचे वेगवेगळे मत कसे काय असू शकते?.

कोरोना विषाणूविरोधी ९० टक्के प्रभावी लस विकसित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या