27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडागांगुलीने मारला स्टार खेळाडूंना टोमणा

गांगुलीने मारला स्टार खेळाडूंना टोमणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली हा भारताचा एक महान कर्णधार म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी मॅच फिक्सिंमुळे भारतीय क्रिकेट हादरून गेले होते. त्यावेळी सौरभ गांगुलीने कर्णधार पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देत क्रिकेट चाहत्यांचा विश्वास पुन्हा जिंकला.

मात्र अशा या सौरभ गांगुलीला २००५ मध्ये भारतीय संघातून डच्चू मिळाला होता. तो अंत्यत खराब कामगिरी करत होता असे नाही मात्र त्याचे आणि नव्याने नियुक्ती झालेले प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याशी मतभेद झाले होते. त्यामुळे गांगुली जवळपास सहा महिने संघाबाहेर होता. याबाबत त्याने द टेलिग्राफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळतानाच्या अनुभवाबाबत प्रतिक्रिया दिली होती.

तो म्हणाला की, देशांतर्गत क्रिकेट खेळणे कठिण होते असें मी म्हणणार नाही. मात्र तेव्हाची परिस्थिती कठिण होती. कारण काही गोष्टी माझ्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या देखील बाहेर होत्या. त्यावर माझे नियंत्रण नव्हते. मी भारतासाठी कोणताही ब्रेक न घेता सलग १३ वर्षे खेळलो होतो. मी कोणतीही गोष्ट चुकवली नव्हती. मालिका नाही की टूर नाही. मी आताचे अनेक खेळाडू जशी विश्रांती घेतात तशी कोणतीही विश्रांती घेतली नव्हती. त्यामुळे मी माझ्या १७ वर्षाच्या कारकिर्दितले ते चार – सहा महिने ब्रेक म्हणूनच समजतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या