22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeक्रीडाक्रिकेटच्या मैदानात गांगुली करणार पुनरागमन

क्रिकेटच्या मैदानात गांगुली करणार पुनरागमन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. दादाने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामद्वारे लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सीझन २ मध्ये एक सामना खेळण्याची पुष्टी केली. त्यामुळे भारतीय चाहत्यांना सौरव गांगुली पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या सामन्याची तयारी सुरू केली असून तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. गांगुलीने जिममधील स्वत:चे फोटो देखील पोस्ट केले आहेत आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने आपण लिजेंड्स लीग क्रिकेट खेळत असल्याची पुष्टी केली आहे.

गांगुलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, आझादी का अमृत महोत्सवासाठी निधी उभारण्यासाठी सामन्यासाठी तयार होण्यासाठी प्रशिक्षणाचा आनंद घेत आहे. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि महिला सशक्तीकरणासाठी लिजेंड्स लीग क्रिकेटच्या शीर्ष दिग्गजांसह लवकरच लिजेंड्स लीग क्रिकेट सुरू होईल.

सौरव गांगुलीने ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दादाने सर्व फॉरमॅटमध्ये १८,५७५ धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील १९५ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ९७ जिंकले. गांगुलीने १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि लॉर्डस्वरील त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या