31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home क्रीडा अँजिओप्लास्टीनंतर गांगुलीची प्रकृती स्थिर

अँजिओप्लास्टीनंतर गांगुलीची प्रकृती स्थिर

एकमत ऑनलाईन

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात येत आहे.

शनिवारी हृद्यविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वुडलँड या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. शनिवारी संध्याकाळीच त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

सौरव गांगुली शनिवारी जीममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याच्या डोळयासमोर अंधेरी आली,आणि तो कोसळला होता. त्यानंतर त्याला तातडीने कोलकातामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

अखेर कष्टाचे चीज झाले; अदर पुनावाला यांनी ट्विट करून व्यक्त केला आनंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या