24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home क्रीडा रोहित शर्मावर संतापले गावसकर

रोहित शर्मावर संतापले गावसकर

एकमत ऑनलाईन

ब्रिस्बेन : रोहित शर्मा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे पण जेव्हा वेळ टेस्ट क्रिकेटची येते तेव्हा तो अनेकवेळा निशाण्यावर येतो. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये वारंवार चुका करत आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येही रोहित लयीत दिसत होता, तेव्हा त्याने खराब शॉट मारून आपली विकेट दिली. नॅथन लायनने टाकलेला बॉल रोहित हवेत खेळला आणि मिचेल स्टार्कने त्याचा कॅच पकडला. रोहित आऊट होताच सुनील गावसकर चांगलेच भडकले आणि त्यांनी रोहितवर टीका केली. काय गरज आहे असा बेजबाबदार शॉट खेळायची? डीप स्क्वेअर लेगवर फिल्डर उभा आहे. दोन बॉल पहिले तू एक फोर मारला आहेस, असा शॉट कोण मारते? तू एक वरिष्ठ खेळाडू आहेस, या शॉटसाठी कोणतेही कारण नाही. आपण स्वत:ची विकेट गिफ्ट म्हणून दिली आहे, असे गावसकर म्हणाले.

रोहितचे स्पष्टीकरण
गावस्कर यांच्या टीकेला उत्तर देताना रोहित म्हणाला, मी आज ज्या प्रकारे खेळलोय, त्यासाठी मी समाधानी आहे. नॅथनने टाकलेला चेंडूचा टप्पा माझ्या बॅटवर अचूक बसला. पण मी अपेक्षित फटका मारण्यात अपयशी राहिलो. मला लॉंग ऑन आणि डीप स्केवअर लेगच्या फिल्डरमधून फटका मारायचा होता, मात्र मी त्यात अपयशी ठरलो. परिणामी मी बाद झालो. मात्र मी जसा खेळलो त्याबाबत मी समाधानी आहे , अशी प्रतिक्रिया रोहितने दिली. रोहित व्हडिओ कॉनफरंिन्सगद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळेस त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली.

पंढरपूरात कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या