27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडापश्चिम विभागीय बॅ़डमिंटन स्पर्धेत गोव्याचे आव्हान संपुष्टात

पश्चिम विभागीय बॅ़डमिंटन स्पर्धेत गोव्याचे आव्हान संपुष्टात

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी येथे सुरू झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत दोन्ही गटाचे संघ पराभूत होत गोव्याचे आव्हान संपूष्टात आले आहे़ तर गुजरात व छत्तीसगड संघाने दुस-या फेरीत प्रवेश केला आहे.

येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेचे शानदार उदघाटन झाले़ सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात गोव्याचे पुरूष एकेरी, महिला एकेरी व पुरूष डबल या तिन्ही गटात पराभवाचा सामना करावा लागला. १९ वर्षाआतील गटात गोवा संघाचा छत्तीसगडने एकतर्फी पराभव केला. मुलांच्या एकेरीत छत्तीसगडच्या एम.व्ही. अभिषेक याने गोव्याच्या निशांत शेनॉयचा, मुलींच्या एकेरीत तनू चंद्र हिने जान्हवी महाले हिचा तर मुलांच्या दुहेरीत रौनक चव्हाण व सौरव शाहू यांनी गोव्याच्या आर्यमान सरट व यश हलारनकर या जोडीवर एकतर्फी दोन विरुध्द शुन्य डावाने मात केली.

वरीष्ठ गटातील एकेरीच्या लढतीत अधीप गुप्ता, अधिता राव यांनी गोव्याच्या अयान शेख व अंजनाकुमारी यांचा तर दुहेरीत भाविन जाधव व पुरुषोत्तम आवटे यांनी गोव्याच्या अर्जुन फालरी व तेजस फालरी यांचा एकतर्फी धुव्वा उडवत गोव्याचे आव्हान संपुष्टात आणले. स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून डॉ. सतिश मल्या, स्पर्धा नियंत्रक म्हणून मिहीर रातंजनकर, सहपंच प्रमुख म्हणून सचिन भारती आदी काम पाहात आहेत.

पश्चिम विभागीय स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह छत्तीसगड, गोवा, गुजरात व मध्यप्रदेश राज्याचे वरीष्ठ व १९ वर्षाआतील मिक्स संघ सहभागी झालेले असून त्यामध्ये १२५ खेळाडूंचा समावेश आहे. त्याच बरोबर अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू देखील सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राचे प्रिया हब्बू, रिशा दुबे, आर्या ठाकुर, ध्रुव ठाकुर, वरुण कपूर, सिमरण सिंघी, रितीका ठाकेर यांच्यासह मध्यप्रदेशच्या प्रियांश राजावत, आलाप मिश्रा या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमधील लढती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या