24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडाऐश्वर्य प्रताप सिंह तोमरचा सुवर्णवेध

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरचा सुवर्णवेध

एकमत ऑनलाईन

चांगवॉन : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत शनिवारी ५० मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तोमरने हंगेरीच्या झलान पेकलारचा १६-१२ असा पराभव केला. ऐश्वर्य प्रताप सिंहने पात्रता फेरीत देखील ५९३ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले होते.

दरम्यान, ५० मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात हंगेरीचा अनुभवी खेळाडू इस्तेवान याला कांस्य पदक मिळाले. रकिंग राऊंडमध्ये तोमरने पहिल्या दोन नेलिंग आणि प्रॉन पोजिशनमध्ये अचूक वेध घेत अव्वल गुण मिळवले. मात्र शेवटच्या स्टँडिंग पोजिशनमध्ये त्याने सर्व ७ गुण गमावले.

या प्रकारात सहभागी झालेला भारताचा दुसरा शूटर चौनसिंह सातव्या स्थानावर राहिला. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने ट्विट केले.
साईने सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप २०२२ चांगवॉन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या