24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाग्रॅँडमास्टर प्रज्ञानंद ठरला विजेता

ग्रॅँडमास्टर प्रज्ञानंद ठरला विजेता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. १६ वर्षीय प्रज्ञानंदने नॉर्वे बुद्धिबळ अ खुली स्पर्धा जिंकली.आर. प्रज्ञानंदने एकूण ९ फे-यांमध्ये ७.५ गुण मिळवून ही कामगिरी केली. शेवटच्या सामन्यात प्रज्ञानंदने व्ही. प्रणीतचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

प्रज्ञानंद गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने दुस-यांदा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आणि चेसबल मास्टर्सच्या अंतिम फेरीत चीनच्या डिंग लिरेनकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईचा रहिवासी असलेल्या प्रज्ञानानंदने २०१८ मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले होते. ही कामगिरी करणारा प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू होता, आणि जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता.

प्रज्ञानंद सर्वात तरुण ग्रँडमास्टर्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने या खेळाडूला मार्गदर्शन केले आहे. ग्रँडमास्टर झाल्यापासून प्रज्ञानंदने सातत्याने प्रगती केली पण त्यानंतर कोविड-१९ महामारीमुळे अनेक स्पर्धा थांबल्या होत्या. प्रज्ञानानंदने वयाच्या १२ व्या वर्षे ग्रँड मास्टरची पदवी संपादन केली. तो भारताचा सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे. त्याच वेळी २०१८ मध्ये तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. त्याच्या आधी केवळ युक्रेनचा सर्गेई कर्जाकिन हा १९९० मध्ये वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या