26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home क्रीडा दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय

दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय

एकमत ऑनलाईन

दुबईत : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने दिलेली ९४ धावांची दमदार सलामी आणि ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची अर्धशतकी भागादारी याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित षटकांत १७६ धावांचे आव्हान दिले होते. सलामीवीर पृथ्वी शॉने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करीत ६४ धावा ढोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ गडगडला. डु प्लेसिस आणि केदार जाधवच्या अर्धशतकी भागीदारीव्यतिरिक्त अन्य फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे दिल्लीचा ४४ धावांनी विजय झाला.

तिस-या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या दोघांनी चेन्नईच्या बॉलरची धुलाई केली मात्र, शिखर धवन ३५ धावांवर असताना पायचित झाला. या दोघांनी ९४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतरही पृथ्वी शॉने धडाका सुरूच ठेवला. मात्र, १३ व्या षटकात धोनीच्या चपळाईने त्याला यष्टीचित केले.

शॉने ४३ चेंडूंत ६४ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या जोडीने फटकेबाजी करीत अर्धशतकी भागीदारी केली. परंतु १८ व्या षटकात मोक्याच्या क्षणी श्रेयस धोनीकरवी झेलबाद झाला. त्यामुळे पंत आणि स्टॉयनिस या जोडीने १७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर चेन्नईचा संघ फार कमाल दाखवू शकला नाही. निर्धारित २० षटकांत ७ बाद १३१ धावा अशी दयनीय स्थिती झाली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी शानदार विजय मिळविला.

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या