28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeक्रीडाबीसीसीआयची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद

बीसीसीआयची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : बीसीसीआयचे नाव आता थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. भारतामधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा विश्वविक्रम रचला गेला. त्यामुळे बीसीसीआयला आता हा जगातील सर्वात मानाचा पुरस्कार मिळाला आहे.

बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या स्टेडियममध्ये बरेच सामने खेळवले गेले. या सर्व सामन्यांपैकी एका लढतीत हा विश्वविक्रम रचला गेला होता. त्यामुळे या गोष्टीची दखल आता थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे आणि आज बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावर्षी आयपीएलमधील महत्वाचे सामने या मैदानात खेळवण्यात आले होते. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय सामनेही या मैदानात झाले. पण आयपीएलच्या सामन्यात हा विश्वविक्रम झाला आहे. यावर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या अंतिम सामन्यात गुजरातच्या संघाने बाजी मारली. गुजरातचा संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरला होता आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली होती. पण या अंतिम फेरीत एक विश्वविक्रम झाला होता. हा सामना स्टेडियममध्ये जाऊन तब्बल १ लाख, १ हजार आणि ५६६ लोकांनी पाहिला होता. आतापर्यंत टी-२० सामन्यासाठी एवढे जास्त चाहते कधीही मैदानात पोहोचले नव्हते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या