अहमदाबाद : आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत रंगला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ८ गडी गमावून १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला २० षटकांत ६ गडी गमावून १२५ धावा करता आल्या.
दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला. दिल्लीचे फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांच्या जाळ्यात पुरते अडकले होते. गुजरातचा फलंदाज मोहम्मद शमीने दिल्लीच्या चार खेळाडूंनी तंबूत पाठवले. १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाची खराब सुरुवात झाली.