नवी दिल्ली : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुस-या हंगामाला येत्या २० सप्टेंबर रोजी सुरुवात होणार आहे. या लीगचा अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. यावेळी चार संघात ही स्पर्धा रंगणार आहे. या लीगच्या दुस-या हंगामात देखील खेळताना दिसणार आहे.
या स्पर्धेत हरभजनसोबत वीरेंद्र सेहवाग , इरफान पठाण , युसूफ पठाण, मुथय्या मुरलीधरन, मोन्टी पानेसर, प्रवीण तांबे , नमन ओझा, एस बद्रीनाथ, स्टुअर्ट बिन्नी, असगर अफगान यांसारखे खेळाडूदेखील खेळताना दिसणार आहेत.
लीगच्या दुस-या सत्रात चार संघ आणि ११० माजी खेळाडू भाग घेणार आहेत. यावर हरभजनने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. ‘मैदनात पुन्हा उतरण्यासाठी मी खुप उत्साही आहे.’ अशी भावना हरभजनने व्यक्त केली. तसेच, या लीगमध्ये एस.श्रीसंत ९ वर्षानंतर पुन्हा मैदानात उतरणार आहे.
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या दुस-या हंगामात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचे खेळाडू एकसोबत खेळताना दिसणार आहे. या लीगच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा माजी खेळाडूंचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे.