23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाहार्दिकचे पुनरागमन

हार्दिकचे पुनरागमन

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून दुखापतीने ग्रस्त आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या दरम्यान पांड्याने पुनरागमन केले, पण तो बॉलिंगपासून दूर होता. याच कारणामुळे त्याला टेस्ट टीममध्ये जागा मिळाली नाही. आता पांड्याचे आगामी लक्ष्य टी-२० वर्ल्ड कप असून त्याची तयारी त्याने सुरू केली आहे.

हार्दिकचा पुढील महिन्यात होणा-या श्रीलंका दौ-यासाठी टीममध्ये समावेश झाला आहे. या दौ-यावरील तीन वन-डे आणि तीन टी-२० सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून वर्ल्ड कपसाठी जागा निश्चित करण्याचे हार्दिकचे लक्ष्य आहे. मला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणा-या टी-२० वर्ल्ड कपमधील प्रत्येक मॅचमध्ये बॉलिंग करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करायची आहे. माझे पूर्ण लक्ष आगामी वर्ल्ड कपवर आहे. असे हार्दिकने सांगितले. हार्दिकचे २०१९ मध्ये ऑपरेशन झाले होते. पांड्याने पुढे सांगितले की, मी बॉलिंगसाठी किती फिट आहे, हे महत्त्वाचे आहे.

टीम इंडियासमोर टी-२० वर्ल्ड कपसाठी अनेक पर्याय आहेत. कृणाल पांड्या आणि रवींद्र जडेजा या दोन ऑलराऊंडरचे पर्याय टीमकडे आहेत. असे असले तरी फास्ट बॉलिंग करू शकणारा हार्दिक हा एकमेव ऑलराऊंडर आहे.

लसीकरणातील अंतरावरून संभ्रम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या