18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeक्रीडाहरमनप्रीत सिंग प्लेअर ऑफ द इयर

हरमनप्रीत सिंग प्लेअर ऑफ द इयर

एकमत ऑनलाईन

कोलकाता : भारतीय हॉकी संघाचा डिफेंडर आणि उपकर्णधार हरमनप्रीत सिंग सलग दुस-या वर्षी एफआयएच प्लेयर ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आले. पुरूष गटात सलग दोन वर्ष सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा हरमनप्रीत हा चौथा खेळाडू आहे. तसेच तो नेदरलँडचा ट्युने डी नूझियर, ऑस्ट्रेलियाचा जेमी ड्वायर आणि बेल्जियमचा आर्थर व्हॅन डोरेन यांच्या एलिट लिस्टमध्ये सामील झाला आहे.

हरमनप्रीत आधुनिक काळातील हॉकी सुपरस्टार आहे. तो एक हुशार बचावपटू आहे ज्याच्याकडे प्रतिस्पर्ध्याला पछाडण्यासाठी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचण्याची त्याच्यात क्षमता आहे. त्याची ड्रिब्ल्ंिग क्षमता शानदार आहे. तो खूप गोलही करतो. यामुळे त्याची सलग दुस-या वर्षी एफआयएचचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आली आहे असे एफआयएचने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

हरमनप्रीत सिंगची दमदार कामगिरी
हरमनप्रीतने (२६) एकूण २९.४ गुण मिळवले. त्यानंतर थियरी ब्रिकमनने २३.६ आणि टॉम बूनने २३.४ गुण मिळवले. भारतीय उपकर्णधार हरमनप्रीतने एफआयएच हॉकी प्रो लीग २०२१-२२ मध्ये दोन हॅटट्रिकसह १६ सामन्यांमध्ये १८ गोल केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या