24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाहसीन जहॉंने शमीला पुन्हा डिवचले

हसीन जहॉंने शमीला पुन्हा डिवचले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पूर्वाश्रमीची पत्नी हसीन जहाँ सातत्याने वादग्रस्त विधान करत असते. शमी संदर्भात नेहमी वादग्रस्त पोस्ट शेअर करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करते. दोघांचाही वाद सोशल मीडियावर चर्चेत असतो. दरम्यान, भारताच्या विजयानंतर हसीनाने संघाचे कौतुक करत शमीवर शेरेबाजी केली आहे.

मागील रविवारी आशिया चषकातील भारत पाकिस्तान सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचे अभिनंदन करणारी इंस्टाग्राम पोस्ट हसीन जहॉंने केली होती. या पोस्टमध्ये अष्टपैलू खेळाडू पांड्यासह संघातील खेळाडूंचे कौतुक केले. पण शमीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

हसीनाने काय म्हटले आहे पोस्टमध्ये?
अभिनंदन. महान विजयङ्घ देशाला विजय मिळवून दिल्याबद्दल आपल्या वाघांचे खूप खूप आभार. हे व्हायला हवे होते. देशाचा दर्जा, देशाची प्रतिष्ठा, इमानदार, देशभक्तांपासून वाचते, गुन्हेगार आणि महिलांच्या मागे लागणा-यांमूळे नाही.’’ अशी सोशल पोस्ट हसीनाने केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या