26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeक्रीडापॅरालिम्पिक स्पर्धेत अरुणा तंवरने रचला इतिहास

पॅरालिम्पिक स्पर्धेत अरुणा तंवरने रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

मुंबई : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये यंदा भारताचे मोठे पथक रवाना होणार आहे. यात तायक्वांदो खेळाडू अरुणा तंवरचाही समावेश असणार आहे. वाईल्ड कार्डच्या माध्यमातून टोकियोमध्ये होणाºया पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. आजवर टोकियो आॅलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमध्ये कोणताही भारतीय तायक्वांदो खेळाडू क्वालिफाय होऊ शकलेला नाही. पण यंदा भारताला वाईल्ड कार्डच्या माध्यमातून पॅरालिम्पिक तायक्वांदोमध्ये प्रवेश मिळाला आहे. पॅरालिम्पिक तायक्वांदोमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी अरुणा भारताची पहिली खेळाडू ठरणार आहे.

अरुणाला जबरदस्त कामगिरीच्या जोरावरच वाईल्ड कार्डमधून पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे, असे भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांनी सांगितले. हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील रहिवासी असलेली अरुणा जन्मापासूनच स्पेशल चाईल्ड आहे. तिचा हात आणि हाताची बोटे आखूड आहेत. पण अरुणाने कधीच त्याची कमतरता किंवा कमीपणा भासू दिला नाही. अरुणाचे वडील एका खासगी बसचे ड्रायव्हर आहेत आणि आपल्या मुलीने खेळात देशाचे नाव जगाच्या पाठीवर गाजवावे, असे त्यांचे स्वप्न आहे. पाच वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या अरुणाने गेल्या चार वर्षांपासून आशियाई पॅरालिम्पिक चॅम्पियनशीप आणि जागतिक पॅरा तायक्वांदो चॅम्पियनशीप स्पर्धेत पदकांची कमाई तिने केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा २४ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.

विवेकानंद रुग्णालयास व्हेंटिलेटर प्रदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या