मुंबई : भारतीय महिला संघाचा कणा असलेली मिताली राज हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. मिताली महिला क्रिकेटर्समध्ये ७ हजार धावा करणारी पहिलीच क्रिकेटर आहे. १९९९ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या मितालीने नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला ओलांडला होता. या विक्रमानंतर आता मितालीने पुन्हा एकदा दुस-या विक्रमाला गवसणी घातलीय.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा
भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यात मितालीने आपल्या वनडे कारकीर्दीतील ७ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. या मॅचमध्ये ४५ धावांची सुंदर खेळी करत तिने हा विक्रम आपल्या नावे केलाय. वनडे सर्वाधिक रन्स करणा-या महिला फलंदाजामध्ये दुस-या क्रमांकावर इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्स आहे.
इंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्सच्या नावावर ५९९२रन्स आहेत. महिला क्रिकेटमध्ये मितालीने सर्वप्रथम ६००० आणि ७०००हजार धावांचा टप्पा पार केला आहे. ज्यावेळी तिने ६००० धावा केल्या होत्या तेव्हा तर जागतिक महिला क्रिकेटमध्ये ती अशी एकमेव खेळाडू होती की जिच्या नावावर ६ हजार धावांची नोंद होती.
मितालीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारी मिताली राज दुसरी महिला फलंदाज आहे. मितालीने ३११ वी मॅच खेळताना ही कमाल केली आहे. तिने आतापर्यंतच्या आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ७५ अर्धशतक ठोकलीत तसंच तिच्या नावावर ८ शतके देखील आहेत. मिताली अगोदर इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स हिने १० हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय.
आरोपी बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट