18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडागावसकर यांच्या नावे वानखेडेवर ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’

गावसकर यांच्या नावे वानखेडेवर ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे २९ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमचा ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’ लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावे करण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या एमसीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याच प्रसंगी ‘दिलीप वेंगसरकर नॉर्थ स्टँड’ चे देखील यादिवशी उद्घाटन करण्यात येईल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून हॉस्पिटॅलिटी बॉक्स सुनील गावसकर यांच्या नावे सुपुर्द करेल, असे अ‍ॅपेक्स कॉन्सिलच्या सदस्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

दिलीप वेंगसरकर नॉर्थ स्टँडचे उद्घाटन हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शरद पवार यांच्या हस्ते होईल. तर जी. आर. विश्वनाथन यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर या दोघांनाही मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सन्मानित केले जाणार आहे.

भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकरने तब्बल १२५ कसोटी सामने खेळले आहेत. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये गावसकर यांनी १० हजार १२२ धावा केल्या. लिटल-मास्टरने एकूण १०८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्यांनी २ हजार ९२ धावा केल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या