25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडामुंबई इंडियन्सच्या निशाण्यावर हैदराबाद

मुंबई इंडियन्सच्या निशाण्यावर हैदराबाद

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएल २०२२ लीग आता टप्प्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाली आहे. या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. या भागात, मंगळवार, १७ मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई एकीकडे प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे तर हैदराबादला अंतिम ४ मध्ये पोहोचण्याचे आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. जर संघ आज हरला तर तो प्ले ऑफच्या शर्यतीतून औपचारिकपणे बाहेर होईल. दुसरीकडे, मुंबईचा संघ हैदराबादचा खेळ खराब करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

मुंबई इंडियन्स
जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सध्याचा सक्रिय यशस्वी गोलंदाज. त्याची हंगामाची सुरुवात चांगली झाली नाही. पण त्याने आपली लय परत मिळवली आहे आणि तो सनरायझर्ससाठी सर्वांत मोठा धोका ठरू शकतो. बुमराहने आतापर्यंत १२ सामन्यांत ११ बळी घेतले आहेत. या वेळी त्याची इकॉनॉमी ७.१९ असून १० धावांत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या