27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeक्रीडाहैदराबादच्या प्ले ऑफ च्या आशा पल्लवीत

हैदराबादच्या प्ले ऑफ च्या आशा पल्लवीत

एकमत ऑनलाईन

हैदराबादच्या गोलंदाजां ची अचूक कामगिरी व मनीष पांडे आणि विजय शंकर यांच्या नाबाद शतकी भागीदारीने दुबई मैदानावर हैदराबाद ने आपला सहज विजय साकार केला. त्यांनी राजस्थानचा आठ गडी व अकरा चेंडू राखून पराभव केला. या विजयाने हैदरबादच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, आता त्यांना यापुढील प्रत्येक सामना जिंकावा लागेल त्यांचे दहा सामने झाले असून त्यांना पंजाब दिल्ली बंगळुरू मुंबई या चारही बलाढ्य संघांना हरवावे लागेल.

राजस्थानचा मार्ग मात्र कठिण झाला असून त्यांचे अकरा सामन्यात फक्त आठ गुण आहेत त्यांना मुंबई पंजाब, व कलकत्ता यांच्याशी सामने खेळावयाचे आहेत त्यांनी तीन्ही संघांना हरवलं तरी त्यांना प्ले ऑफ मध्ये जाण्याची संधी मिळण अवघड आहे सध्याची खेळपट्टीची परिस्थििती पाहता जलद गोलंदाज चांगली कामगिरी करू लागले आहेत गेल्या सामन्यात मोहम्मद सिराजन चार तर या सामन्यात जेेसन होल्डरन तीन बळी घेतले

तेराव्या आयपीएल मधील चाळीसाव्या सामन्यात दुबई मैदानावर हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर ने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीस पाचारण केले प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजांना सातत्य दाखवण्यात अपयश आल्याने आव्हान उभे करताना पुन्हा एकदा कच खाल्ली. त्यांचा डाव ६ बाद १५४ असा मर्यादित राहिला. त्यानंतर हैदराबाद संघाने १८.१ षटकांत २ बाद १५६ धावा करून विजय मिळविला. मनिष पांडे(४७चेंडूत चार चौकार व आठ षटकारांसह ८३) आणि विजय शंकर(५१चेंडूत सहा चौकारांसह ५२) यांच्यात झालेली नाबाद १४० धावांची भागीदारी निर्णायक ठरली.

आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा जोफ्रा आर्चरने पहिल्या व तिसऱ्याच षटकात राजस्थानला आशा दाखवली. त्याने पहिल्या दोन षटकांत ५ धावा देत हैदराबादची सलामीची जोडी तंबूत परत पाठवली. पण, त्यानंतर डावाच्या मध्यात त्याचेच चौथे षटक राजस्थानला सामन्यापासून दूर घेऊन गेले. या षटकात विजय शकंरने लागोपाठ तीन चौकार वसूल करताना हैदराबादचा विजय निश्चित केला.आव्हान फारसे मोठे नसताना हैदराबादला सलामीची जोडी लवकर गमवावी लागली त्यानंतर पांडे आणि बढती मिळालेल्या विजय शंकर यांनी राजस्थानच्या गोलंदाजांना वरचढ होण्यापासून रोखले. चौफेर फटकेबाजी करताना त्यांनी धावांची आवश्यक गती देखील राखली.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला रॉबिन उत्थप्पाला पॉवर प्लेमध्ये गमावणे नक्कीच महागात पडले. त्याला जेसन होल्डर ने धावबादकेले उत्थप्पाची (१३चेंडूत१९)सुरवात लक्षात घेता राजस्थानला चांगली सुरवात मिळणार असेच वाटत होते. पण, तो धावबाद झाल्यानंतर जेसन होल्डरने (३३धावात३बळी)मोसमातील पहिलाच सामना खेळताना राजस्थानच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. त्याने तीन गडी बाद करताना सॅमसन-स्मिथ ही जमलेली जोडी फोडली. विजय शंकर आणि रशिद खान यांनीही आपली षटके अचूक टाकली. त्यांच्याकडून केवळ नटराजन (४षटकात४६)हा गोलंदाज महागडा ठरला. पण, त्यानंतरही त्याने अखेरचे षटक चांगले टाकले. त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी मोडलेला डाव नव्याने जोडण्याचा प्रयत्न केला.

या जोडीने ५६ धावांची भागीदारी केली अकराव्या षटकात राजस्थानचा डाव तीन बाद ८६ होता. मात्र, ते शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहू शकले नाहीत. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने स्टोक्स फलंदाजीस आल्याबरोबर रशीद खानला गोलंदाजी दिली रशीद खानन आपलं काम चोख बजावले रशिदन स्ट्रोकचा त्रिफळा उडवला बैन स्टोक्स (३०) आणि सॅमसन(३६) दोघे बाद झाल्यावर पुन्हा एकदा राजस्थानच्या धावगतीवर मर्यादा आली. रियान पराग,(२०) स्टिव्ह स्मिथ(१९), जोफ्रा आर्चर (नाबाद१६)यांनी शेवटी दिलेल्या योगदानामुळे राजस्थानला दीडशेची मजल शक्य झाली.

डॉ.राजेंद्र भस्मे

आगळगाव रोडवर भरदिवसा निवृत्त शिक्षाकाच्या डोक्यात दगड घालून खून

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या