22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाद्रविड प्रशिक्षक होणार कल्पनाच नाही

द्रविड प्रशिक्षक होणार कल्पनाच नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविडचे नाव चर्चेत असल्याचे मला माहिती आहे, परंतु याविषयी अंतिम निर्णय झाला आहे की नाही, याची मला कल्पना नाही. कोणीही माझ्याशी याविषयी सविस्तर संवाद साधलेला नाही, असे कोहली म्हणाला. यासंबंधी अधिक भाष्य करण्याचे कोहलीने टाळले. मात्र कोहलीच्या वक्तव्यामुळे द्रविडच्या नेमणुकीबाबत चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होणार आहे. राहुल द्रविडने बीसीसीआयचा प्रस्ताव स्वीकारला असल्याची सूत्रांची माहिती आहे. राहुल द्रविड आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याची माहिती शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली. संयुक्त अरब अमिराती येथे होणा-या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.

त्यामुळे त्यांच्यानंतर भारताच्या माजी खेळाडूनेच प्रशिक्षकपद स्वीकारावे, अशी बीसीसीआयची इच्छा होती. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला याबद्दल काहीच माहिती नाही. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाविषयी बीसीसीआयने नेमका कोणता निर्णय घेतला आहे, याची पुरेशी कल्पना नसल्याचे विराट कोहलीने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या